The attacks on Rangoli, internet warrior and Happy Diwali!!! (रांगोळीवरील हल्ले, इंटरनेट योद्धा आणि दिवाळीच्या शुभेच्छा !!!)

(English translation is below, just scroll down)

(Though this is based on a true event, to maintain the privacy of the involved families, few details are changed).







आम्ही नऊ मजल्याच्या इमारतीत राहतो, प्रत्येक मजल्यावर चार फ्लॅट आहेत.

तळ मजल्यावर, एक कुटुंब राहते, दररोज सकाळी त्या घरातली गृहिणी आश्चर्यकारक रांगोळी काढण्यासाठी त्यांच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाच्या समोर 15 ते 30 मिनिटे घालवते. 

हि रांगोळी अर्थातच रोज नवी असते आणि रोज साध्या पद्धतीने आणि पांढऱ्या रंगातच असते, फक्त एखादा सण असेल तर किंचित मोठी डिझाईन आणि इतर रंग वापरलेले असतात. अगदी कमी जागेत  त्या बाई छान रांगोळी काढतात.

पायर्‍यांपासून त्यांचा फ्लॅट अगदी लांब आहे म्हणून त्यांची रांगोळी इतरांसाठी कधीच अडथळा बनली नाही. इतर लोक  त्यांच्या  रांगोळीकडे न पाहताहि सहज पायऱ्या वापरू शकतात.

आमच्या बिल्डिंग मध्ये माझी आई आणि इतर काही स्त्रियाहि स्वतःच्या  घराच्या अंगणात रांगोळी काढतात, पण ही महिला एक उत्तम रांगोळी कलाकार आहे. त्यांच्या  डिझाईन्स, रंगांची निवड त्यांच्या  प्रत्येक रांगोळीला एक उत्कृष्ट कलाकृती बनवतात. बहुतेक सगळेच शेजारी पाजारी त्यांच्या रांगोळी कौशल्याचे कौतुक करतात आणि बर्‍याच स्त्रिया त्यांच्या रांगोळीचे फोटो नेहमी क्लिक करतात.

या दिवाळीत आमच्या इमारतीत काहीतरी वेगळच घडलं आणि त्याचा केंद्रबिंदू ह्या बाईंची रांगोळी असेल असं कधीही कुणालाही वाटलं नसेल.

मी दिवाळीच्या सुट्टीत घरीच होतो, सकाळी सकाळी मी किराणा सामान विकत घेण्यासाठी बाजारात गेलो आणि परत येताना मी पायऱ्या चढत होतो; तळ मजल्यावर मी त्या बाईंना एक अतिशय सुंदर रांगोळी काढताना पाहिल. मी त्या कलाकृतीचे कौतुक करण्यापासून स्वत: ला रोखू शकलो नाही.

मी त्यांना म्हणालो  “मावशी, तुमच्या रांगोळ्या काय अप्रतिम असतात हो, तुम्ही रांगोळी स्पर्धांमध्ये भाग घेतलाच पाहिजे. तूम्ही अजून मोठ्या डिझाईन्स का बनवत नाहीत? ”त्यावर त्या हसत म्हणाल्या, “थँक यु, पण आमची घरातली कामं काही कमी आहेत का? ती काही संपता संपत नाहीत,  मग मी मोठ्या रांगोळ्या कधी काढणार? आणि तसाही काही उपयोग नाहीये? .... आता दुपारचे सगळे दरवाजे बंद झाले कि एक आपल्याच बिल्डिंग मधला मुलगा येतो आणि जाणूनबुजून रांगोळी पुसतो. मी त्याला हे बर्‍याच वेळा करतांना पाहिले आहे परंतु त्याला रंगे  हात पकडला नाही, पण आज ना उद्या मी त्याला नक्की रंगे हात पकडेन, बघ तू”

मला आश्चर्य वाटले आणि धक्काहि बसला. “काय बोलताय मावशी? अशी छान कलाकृती नष्ट करणारा मुलगा कोण असेल? पालकांनी आपल्या मुलांना कसे वागावे हे शिकवले पाहिजे, रांगोळीने कुणाचे काय बिघडवले - आश्चर्य आहे? ”मी म्हणालो.

ती म्हणाली “मला काही कल्पना नाही. मी नेहमीच काळजी घेते की माझ्या रांगोळीचा कुणालाही अडथळा होणार नाही; कितीही मोह झाला तरी मोठी रांगोळी काढून रस्ता अडवत नाही ”

मी म्हणालो “मी सहमत आहे, असो... तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा” माझी कधी मदत लागलीच  तर मला कळवा. ”

त्या हसून म्हणाल्या, “तुलाही दिवाळीच्या शुभेच्छा, आणि अनेक आशीर्वाद”.

मी घरी पोहोचलो, याबद्दल आई आणि बायकोला सांगितले. माझ्या आईने सांगितले की तिची रांगोळीदेखील बर्‍याचदा त्या मुलाने पुसली आहे परंतु तिला फक्त त्या बाईसाठीच वाईट वाटते कारण आईला वाटत कि त्या मावशींची रांगोळी हि जास्त भक्तिभावनेने केलेली असते आणि खूप परिश्रमहि घेतलेलं असतात. पण मी म्हणालो की रांगोळी कुणाचीही असो जर ती कुणाच्या रस्त्यात येत नसेल तर खोडसाळ पणे रांगोळी पुसण्याचा अधिकार कुणालाही नाही.

दुपारी जेवण संपल्यावर मी माझा मोबाईल बघत होतो आणि माझ्या घरचे टीव्ही वर काहीतरी  पहात होते. मला फेसबुकवर एक पोस्ट सापडली - ती पोस्ट केरळची होती - ती एका हिंदूंच्या घरची सीसीटीव्ही फुटेज होती, त्या बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळ एक सुंदर रांगोळी काढली गेली होती, अचानक मुलांचा एक गट आला, ते सर्वजण विशिष्ट टोप्या घातलेले होते आणि त्यांनी अगदी खुनशीपणे ती रांगोळी पुसली. ती फेसबुक पोस्ट एक सोपा प्रश्न विचारत होती - “हिंदू मुलांनी अन्य एखाद्या धर्माच्या कलाकृतीला असे केले असते तर किती निषेध केला गेला असता याचा अंदाज लावता येईल का, हेच जर हिंदू मुलांनी अगदी एकदाच आणि अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातही केलं ना तर आख्या देशाला आणि सगळ्या हिंदूंना काय काय ऐकावं लागेल?” मी काही त्या पोस्ट ला लाईक वगैरे  केल नाही किंवा त्या पोस्टवर काही भाष्यहि केले नाही.

आणि मग आम्ही वरच्या मजल्यावरून मोठं मोठ्याने भांडण्याचा आवाज ऐकला. काय झालंय हे पाहण्यासाठी आम्ही सर्व तिथे धावलो. तळ मजल्यावरील त्या बाई तिसर्‍या मजल्यावरील एका बाईकडे तक्रार करीत होत्या की, दररोज त्यांचा मुलगा मुद्दाम रांगोळी पुसून टाकतो, आणि आज तिने त्या मुलाला रंगेहाथ पकडलाय. तिसर्‍या मजल्यावर राहणारी ती महिला इतर धर्मातील आहे जे दिवाळी साजरी करत नाहीत आणि आपल्या मुलाच्या या आगाऊ कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी आणि स्वतःच्या मुलालाही असे वागू नये हे समजावून सांगण्याऐवजी - ती वरच्या मजल्या वरची बाई उद्धट पणे ओरडत होती कि तुम्ही घराच्या आत रांगोळी का काढत नाही, दारात का काढता? अंगणात रांगोळी बनविणे थांबवलेच पाहिजे.

हा वाद चालूच होता, त्या मुलाचे संपूर्ण कुटुंब खूपच आक्रमक होते आणि अखेरीस तळमजल्यावरील त्या बाई आणखी वाद घालू शकल्या नाहीत आणि अश्रू ढाळत राहिल्या. आम्ही सर्वांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या मुलाच्या कुटूंबाचा उद्धटपणा आणि आक्रमकता खूप होती ते काही समजावून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते, तुम्ही घराबाहेर रांगोळी काढणे हेच कसे चुकीचे आहे हेच ते सांगत होते. अनेक वयोवृद्ध शेजार्‍यांच्या विनंतीनुसार आम्ही त्या रांगोळी काढणाऱ्या बाईंना परत तळ मजल्यावर तिच्या घरी घेऊन गेलो, आम्ही सर्व तिथे एकत्र जमलो आणि चर्चा केली की त्या मुलाच्या कुटूंबाशी वाद घालण्यात काही अर्थ नाही परंतु आपण रांगोळी काढणे काही थांबवू नये - उलट आपण सर्वांनीच एकमेकांच्या रांगोळीवर लक्ष ठेवून तो मुलगा परत असं करणार नाही हे पाहिलं पाहिजे.

जेव्हा मी घरी परत गेलो आणि पुन्हा फेसबुक चेक करत होतो. तीच पोस्ट पुन्हा दिसू लागली - ती फेसबुक पोस्ट एक सोपा प्रश्न विचारत होती - “हिंदू मुलांनी अन्य एखाद्या धर्माच्या कलाकृतीला असे केले असते तर किती निषेध केला गेला असता याचा अंदाज लावता येईल का, हेच जर हिंदू मुलांनी अगदी एकदाच आणि अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातही केलं ना तर आख्या देशाला आणि सगळ्या हिंदूंना काय काय ऐकावं लागेल?” - या वेळी मात्र मी Like वर क्लिक केलंच, आणि मी देखील त्या पोस्टवर भाष्य केल / comment केली की “खोट्या पुरोगामी आणि एककल्ली नाटकी सहिष्णू गॅंग च्या खोटेपणाचा हिंदूंना वीट आला आहे” आणि काही मिनिटांतच इतर धर्मातील एका फेसबुक वापरकर्त्याने माझ्या टिप्पणीवर स्वतःची comment टाकली “आला आणखी एक हिंसक हिंदू इंटरनेट योध्या उगवला”- त्यावर पुन्हा मी काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, कारण मला माहित आहे की मी हिंसक नाही, मी सर्व धर्मांचा आदर करतो आणि  पूर्वग्रह दूषित असणाऱ्या लोकांशी वाद घालण्यात काय अर्थ आहे?... मला हसू मात्र आलं, काय पण नाव मिळालं मला.... म्हणे इंटरनेट योद्धा......." असो हे नाव असुदे कि हे युद्ध दोन्हीही आमच्यावर लादलेलं आहे, आम्ही काही स्वेच्छेने घेतलेलं नाही......

मग मी त्याला smily सहित एक उत्तर दिलं दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.... आणि हो आम्ही सगळेच आता छान छान रांगोळ्या काढतोय बरं का, अगदी रोज :)







The attacks on Rangoli, internet warrior and Happy Diwali!!!

(Though this is based on a true event, to maintain the privacy of the involved families, few details are changed).

We stay in a nine story building, on each floor there are four flats.

On the ground floor, there stays a family, each morning the lady of the house spends 15 to 30 minutes at the entry point of their flat’s main door to draw amazing Rangoli.

Depending on the day the size of Rangoli changes, normally it’s a small white color design occupying hardly one square foot area and if it’s any festival day then the design gets bigger up to 2 to 4 square feet area with beautiful colors added in it.

Their flat is little inside and away from the stairs so her Rangoli designs have never become obstacle for others, only those who are actually going to enter in her home will be actually closer to that Rangoli. Others can easily use stairs to go up without even looking at her Rangoli.

Even my mother and other few ladies draw Rangoli in their house courtyard, but this lady is an amazing artist. Her designs, selection of colors make each of her Rangoli a masterpiece. Entire neighborhood appreciates her Rangoli skills and many ladies always click photos of her Rangoli designs.

This Diwali something significant happened in our building…..

I was on Diwali vacation and was at home, early morning I went to market to buy some grocery items and on my return when I was climbing up the stairs; on the ground floor I saw that lady making an extraordinary Rangoli design. I could not stop myself from praising that artwork.

I told her “Masi (Aunty), it’s an extraordinary design, you must participate in Rangoli competitions. Why don’t you make even bigger designs?” on that she smiled and said “Thank you son but I have so much housework to do, so I can’t give more than 15 to 30 minutes for bigger Rangoli making, anyways what is the use?.... now a days in afternoon when every door is closed, a boy intentionally wipes Rangoli. I have seen him doing it few times but could not catch him red-handed, I am determined to catch him sooner or later.”

I was surprised and shocked. “What are you saying Masi? Who would be that boy who enjoys destroying such an artwork? Parents must teach their kids how to behave, after all Rangoli is such a beautiful & harmless artwork, what problem it could cause to someone?” I said.

She said “I have no idea. I always ensure that my Rangoli designs are not disturbing anyone’s path; I ensure that they are placed in corner. They only add the beauty and do not harm anyone.”

I said “I agree, do let me know if I can help, Happy Diwali”.

She smiled and said “Happy Diwali to you too son, bless you”.

I reached home, told my mother & wife about it. My mother said even her Rangoli is intentionally wiped by same boy many times but she feels bad only for that lady because that lady’s Rangoli is no less than a beautiful creation made out of devotion & a lot of hard work, where as my mother’s Rangoli designs are small and quick easy ones, I said that doesn’t give anyone right to just come and wipe them.

In afternoon we finished our lunch, I was checking my mobile phone and my family was watching television. I found a post on Facebook – post was from Kerala – it was CCTV footage of a Hindu house, a beautiful Rangoli was drawn at the entrance of that bungalow, suddenly a group of boys came, all wearing caps and they disgracefully wiped that Rangoli with their shoes. The act was intentional, cruel & was full with hatred. That Facebook post was asking a simple question – “Can you guess how much the protest would be if Hindu boys would have done this to some other religion’s artwork?” I did not click on like or did not make any comment on that post.

And then we heard loud noise from the upper floor. We all rushed there to see what went wrong. The lady from the ground floor apartment was complaining to the lady staying on the third floor that everyday her son has been deliberately destroying the Rangoli, today she caught the boy red-handed. The lady staying at the third floor is from other religion who do not celebrate Diwali and rather than apologizing for her son’s disgraceful act and rather than making her own son understand that he should not behave like that – that lady was arrogantly shouting on the other lady from the ground floor that why she can’t make Rangoli inside of her house? She must stop making Rangoli in the courtyard.

The argument was going on for quiet sometime, the entire family of that boy was very aggressive and eventually the lady from the ground floor was in tears as she could not argue with them anymore due to their abusive behavior. We all tried to intervene but the arrogance, aggressiveness of that boy’s family was too much to handle. As requested by many elderly neighbors we took that lady back to her home on the ground floor, we all gathered there and discussed that there is no point in arguing with that boy’s family but we must not stop making Rangoli – rather we all should keep making them and keep a watch, help each other to stay united and let no one destroy the Rangoli as well as the peace in our building.

When I went back home and was going through Facebook again. Same post reappeared - That Facebook post was asking a simple question – “can you guess how much the outrage would be if Hindu boys would have done this to some other religion’s art work?” – and I just clicked on the like button, I also commented on that post that “selective outrages, biasness of the liberal & secular gang is breaking the hearts of real secular Hindus – it is really upsetting” and within a few minutes a Facebook user from other religion than mine commented on my comment stating “here comes a Bhakta the violent Hindu nationalist, an internet warrior” – again I did not react, because I know I am not violent, I respect all religions and I understand that there is no point in arguing with those who have stubborn prejudice. Internet warrior – well both are forced on us aren’t they? This name as well as the war.....

Then I replied to him with a smily and a comment "Happy Diwali"
And yes we all are making rangolis each day.....

दिवाळीत पुण्यातल्या आचार्य अत्रे सभागृहात जाऊन पुस्तक आणण्या सारख वेगळं सुख नाही








खरंय अगदी... So many books and so little time.

माझी अवस्था अगदी अशीच होते एखाद्या पुस्तक प्रदर्शनात गेल्यावर किंवा पुस्तकांच्या दुकानात गेल्यावर. आणि दिवाळीत पुण्यातल्या आचार्य अत्रे सभागृहंत जाऊन पुस्तक आणण्या सारखा वेगळं सुख नाही. गेली कित्येक वर्ष दिवाळीत एकही फटाका न आणता, अगदी साधी फुलबाजीहि न उडवता आम्ही नेहमी प्रत्येक दिवाळीत भरपूर पुस्तक आणतो आणि त्या पुस्तकांचा जल्लोष त्या फटाक्यांच्या तुलनेत वर्षानुवर्षे चालूच असतो.

वेग वेगळ्या विषयांना स्पर्श करणार, मराठीच नव्हे तर भारतातल्या आणि जगातल्या अनेक प्रसिद्ध लोकप्रिय लेखकांचं साहित्य एकाच छताखाली वाचायला मिळणं हे काही एखादा मोठा खजिना लाभण्यापेक्षा कमी नाही. हा आनंद जगावेगळाच. पुस्तकप्रेमीच हा आनंद समजू शकतात.

फार अडचण असली तर चार पुस्तक कमी घेऊ आणि शक्य असेल तर भरपूर असं करत हि दिवाळीतली पुण्याच्या अत्रे सभागृहातील दिवाळी पुस्तक प्रदर्शनाची वारी कधी चुकवली नाही.

ऐन लक्ष्मी पूजनाच्या काळात सरस्वतीचं असं सुंदर दर्शन घडवणार ते एक शारदा मंदिरच नाही का? हजारो पुस्तक आणि शेकडो वाचक असं समीकरण झाल्यावर कितीही गर्दी झाली तरी तिथे एक लोभस शांतता असते आणि ती वाचन योगाची असीम शांती अतिशय मनमोहक असते.

पुस्तकात हरवलेले तिथले अबाल वृद्ध हेच सिद्ध करतात कि साहित्याचा पिढ्यान पिढ्या वाहणारा हा प्रवाह अनंत आहे, अनेक वळणं घेत नव्या नव्या स्थानांना भेट देत तो अखंड वाहतच असतो, आपल्या छोट्याशा ओंजळीत आपल्या कुवती प्रमाणे आपण त्याचं तीर्थ घ्यायचं आणि पुन्हा त्याच अनंत प्रवाहात त्याचंच अर्ध्य द्यायचं... इदं न मम् म्हणत..... Happy Reading :) वाचाल तर वाचाल ना !!!

काला पानी

हम सभी लॉक डाउन में बंद है. ये सही समय है जानने का , सोचने का उनके बारे में जिन्हे पुरे जीवन के लिए लॉक डाउन किया गया था. वो भी ए...