खरंय अगदी... So many books and so little time.
माझी अवस्था अगदी अशीच होते एखाद्या पुस्तक प्रदर्शनात गेल्यावर किंवा पुस्तकांच्या दुकानात गेल्यावर. आणि दिवाळीत पुण्यातल्या आचार्य अत्रे सभागृहंत जाऊन पुस्तक आणण्या सारखा वेगळं सुख नाही. गेली कित्येक वर्ष दिवाळीत एकही फटाका न आणता, अगदी साधी फुलबाजीहि न उडवता आम्ही नेहमी प्रत्येक दिवाळीत भरपूर पुस्तक आणतो आणि त्या पुस्तकांचा जल्लोष त्या फटाक्यांच्या तुलनेत वर्षानुवर्षे चालूच असतो.
वेग वेगळ्या विषयांना स्पर्श करणार, मराठीच नव्हे तर भारतातल्या आणि जगातल्या अनेक प्रसिद्ध लोकप्रिय लेखकांचं साहित्य एकाच छताखाली वाचायला मिळणं हे काही एखादा मोठा खजिना लाभण्यापेक्षा कमी नाही. हा आनंद जगावेगळाच. पुस्तकप्रेमीच हा आनंद समजू शकतात.
फार अडचण असली तर चार पुस्तक कमी घेऊ आणि शक्य असेल तर भरपूर असं करत हि दिवाळीतली पुण्याच्या अत्रे सभागृहातील दिवाळी पुस्तक प्रदर्शनाची वारी कधी चुकवली नाही.
ऐन लक्ष्मी पूजनाच्या काळात सरस्वतीचं असं सुंदर दर्शन घडवणार ते एक शारदा मंदिरच नाही का? हजारो पुस्तक आणि शेकडो वाचक असं समीकरण झाल्यावर कितीही गर्दी झाली तरी तिथे एक लोभस शांतता असते आणि ती वाचन योगाची असीम शांती अतिशय मनमोहक असते.
पुस्तकात हरवलेले तिथले अबाल वृद्ध हेच सिद्ध करतात कि साहित्याचा पिढ्यान पिढ्या वाहणारा हा प्रवाह अनंत आहे, अनेक वळणं घेत नव्या नव्या स्थानांना भेट देत तो अखंड वाहतच असतो, आपल्या छोट्याशा ओंजळीत आपल्या कुवती प्रमाणे आपण त्याचं तीर्थ घ्यायचं आणि पुन्हा त्याच अनंत प्रवाहात त्याचंच अर्ध्य द्यायचं... इदं न मम् म्हणत..... Happy Reading :) वाचाल तर वाचाल ना !!!