चितळ्यांची जाहिरात, सन्मानपूर्वक विसर्जन आणि एक नवी सुरुवात…..


चितळ्यांची जाहिरात, सन्मानपूर्वक विसर्जन आणि एक नवी सुरुवात…..


(Same article is also in HINDI.. just scroll below)




श्री गणेशाचा उत्सव भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात खूप हौसेने साजरा केला जातो. इतकच नाही तर जिथे जिथे सनातन हिंदू धर्माचे पालन करणारे आहेत तिथे तिथे गणेशोत्सव साजरा केला जातो.

आमच्या कडेही श्री गणेशाची स्थापना केली जाते, गणेशोत्सवाबरोबर माझ्या अनेक आठवणी जोडलेल्या आहेत. किमान एक महिना आधी पासून श्रींच्या सजावटीची तयारी करणे, ते सगळे सामान आणण्यासाठी बाजारात चकरा मारणे, सगळ्यांनी मिळून घराची साफ सफाई करणे, गणेश चतुर्थी च्या एक दिवस आधी तर घर अगदी लगीन घर बनून जात. प्रत्येक जण काहीतरी तयारी करीत असतो, मोदकांची आणि इतर नैवैद्याची तयारी, फुलं, हार बनवणे, आरतीची तयारी करणे, रांगोळी, पारंपारिक पोशाख, दुर्वा, कमळ आणि असच काय काय... श्रींच्या प्रतिमेला स्वतःच्या हातून घरी आणणे  हा एक आनंददायी अनुभव असतो, ते दिवसच वेगळे असतात. त्या एकामागून एक आरत्या आणि वेगवेगळे प्रसाद. स्वतःच्या घरची आरती करून, शेजारच्यांच्या घरची आरती मग सोसायटी ची आरती, त्या नंतर वेग वेगळ्या मंडळांना भेट देउन तिथली आरास बघणे आणि श्रींच्या वेग वेगळ्या रूपांचे दर्शन घेणे.

या उत्सवाने अनेक नेते घडवले - त्यांना लहान पणा  पासून उत्सव आयोजनातून नेतृत्वाचे धडे मिळाले, या उत्सवाने अनेक कलाकार हि दिले - आपापल्या सोसायटी, कॉलनी आणी आप्त मित्र परिवारासमोर आपल्या कलेचे प्रदर्शन करून या कलाकारांनी पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळवले, मुळात या उत्सवाने सुरवाती पासूनच समाज कल्याण आणि समाज प्रबोधनासाठी प्रेरणा दिली.

केवळ काही परिवार किंवा समुदायाचा कुलाचार किंवा व्रत असणारा  हा गणेश उत्सव लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक केला. पारतंत्र्यात असताना ब्रिटिशांनी आपल्यावर अनेक बंधने टाकली होती. लोकांना एकत्र आणून स्वातंत्र्याच्या गोष्टी करणे तर अशक्यच होते. परंतु श्री लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक करून त्या निमित्त एकत्र झालेल्या लोकांमध्ये स्वातंत्र्याची मशाल पेटवली आणि लोकांना प्रेरणा दिली, मार्ग दाखवला.

पण गेल्या काही वर्षांपासून हा उत्सव बदलला आहे, बदल हि तर कधीही थांबणारी गोष्ट आहे. काही बदल हे चांगले असतात तर काही बदल मात्र प्रश्न निर्माण करतात. या उत्सवाचेही अनेक चांगले अंग आहेत तर काही भाग मात्र विचार करायला लावणारा आणि चांगल्या बदलाची मागणी करणारा आहे. सर्वात दुःखदायक काही असेल तर ते चुकीच्या पद्धतीने सर्रास होणारे विसर्जन.

हा अत्यंत संवेदनशील विषय आहे.

मला कुणाच्याही धार्मिक भावना दुखवायच्या नाही, मी स्वतःच दुखी आहे, याचे कारण म्हणजे मागच्या काही वर्षां पासून आपण चुकीच्या पद्धतीने होणारे विसर्जन पाहत आहोत. दर वर्षी अस्वस्थ करणारे फोटो आणि विडिओ येतात. मी एक विडिओ पहिला ज्यात सरकारी कर्मचारी एका ट्रक मध्ये मुर्त्या गोळा करून एका पुलावर जातात आणि तिथून अक्षरशः त्या मुर्त्या पाण्यात वरूनच टाकून देतात, विसर्जनाच्या दिवसानंतर मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरहि असेच दृश्य दिसते. उत्तर भारतात तर जिथे पाणी जवळ नसेल तिथे तर पिंपळाच्या खाली मूर्ती सरळ ठेवून देतात. हे सगळं बघून मन उदास होत. हे सगळं योग्य आहे का
https://youtu.be/hFCByrlKvNA 
https://youtu.be/QbLfvTztE10


मागच्या पन्नास किंवा शंभर वर्षांकडे वळून बघितले तर लक्षात येईल कि केवळ काही परिवार किंवा समुदाय जे व्रत करीत असत ते आता खूप मोठ्या प्रमाणावर एक उत्सव म्हणून साजरे केले जाते. यात अनेक जण श्रद्धेने हे करतात तर अनेक जण केवळ हौसेसाठी सुद्धा हे करतात. हे सगळंच चांगलं आहे - स्वागतार्ह आहे - पण हे नको का बघायला कि हे सगळं आपण योग्य प्रकारे करतोय कि नाही?

जर आपल्याला श्री गणेश पूजनाचे काही पुण्य मिळत असेल, काही फळ मिळत असेल तर ते आपण चुकीच्या पद्धतीने विसर्जन करून घालवून तर देत नाही ना? आणि उलट त्यामुळे आपल्याला दोष तर लागत नाही ना?

श्री गणेशाचे हे व्रत अत्यंत लाभदावक आहे, पुण्यवर्धक आहे, जे हे व्रत करतात त्यांना सुख समृद्धी मिळते, यश मिळते. परंतु चुकीच्या विसर्जनामुळे आपण या सगळ्या वर पाणी तर नाही ना टाकत?

आपल्या घरातल्या मंदिरातल्या धातूच्या मूर्तीबरोबरच केवळ भाद्रपद चतुर्थीला पार्थिव गणेशाची स्थापना केली जाते. (पार्थिव अर्थात मातीची). आणि या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी साक्षात चैतन्य श्री गणेश यात आगमन करीत आहेत याची श्रद्धा ठेवून पूजा अर्चना केली जाते. दीड दिवसांनी, म्हणजे दुसऱ्या दिवशी दुपारी विसर्जन करण्यापूर्वी पुन्हा पूजा करून श्रद्धेने त्या मुर्तीत विराजमान असलेल्या चैतन्याला  पुन्हा पुढच्या वर्षी नक्की या हे सांगतच निरोप दिला जातो. हेच तर सुष्टीचे अनंत चक्र आहे - नाही का? पंच महाभूतांपासून आपण बनतो आणि त्यांच्यातच विलीन होतो - अगदी तसेच निसर्गापासून तयार झालेली मूर्ती पुन्हा निसर्गात पूर्णपणे एक होऊन जाते. पूर्वी काटेकोर पणे व्रत पाळले  जाई, खूप निष्ठेने सेवा केली जाई, यात कठोर साधना होती, भक्ती होती आणि प्रेमही होतेच. कालांतराने दीड दिवसाचा गणपती कुठे तीन तर कुठे पाच तर कुठे सात तर कुठे दहा दिवसांचा झाला - यात ज्याच्या त्याच्या परंपरा, पद्धती आणि श्रद्धा होती. गौरीपुत्र श्री गणेश मात्र कुणी किती दिवस पूजा केली किंवा कशी केली यापेक्षा किती श्रद्धेने मनापासून केली यालाच महत्व देतात आणि सर्व खऱ्या भक्तांची रक्षा करतात त्यांना आशीर्वाद देतातं, यश देतात.

आज पण आपण त्याच श्रद्धेने, भक्तीने, प्रेमाने पूजा करतो का? मला वाटत हो आपण करतो. आपल्या सर्वांचाच श्री गणेशावर आणि आपल्या हिंदू धर्मावर नितांत विश्वास आहे, मग आपण चांगल्या बदलावासाठी पुढाकार का नाही घेत?

आपण सगळे श्रींच्या सन्मानपूर्वक विसर्जनाचा आग्रह का नाही करत. मोठं मोठ्या मुर्त्यांचा आग्रह का? त्या वर केमिकलचा रंगांचा आग्रह का? आणि मग त्या मुर्त्या आपण नदीत, समुद्रात, तलावात टाकणार, अगदी अशुद्ध पाण्यातही आणि पिंपळाच्या झाडाखालीही ठेवणार, पुलावरून टाकणार, सरकारी कर्मचारी कसेही विसर्जन करणार. हे सगळं योग्य आहे का?

आपल्या श्रींच्या उत्सवात काहीही कमी करायची नाहीये - उत्साह वाढवणारा तो ढोल वाजू देत, सुंदर रांगोळ्यांनी धरती सजू देत, विविध प्रकारचे पक्वान्न नैवेद्याला होऊ देत, पूजा होऊ दे, होम हवन होऊ दे, आरत्या तर हव्याच, कलेच्या प्रदर्शनाला वाव मिळू देत, फक्त विसर्जन करताना चुकूनही प्रतिमेचा अपमान होता कामा नये, जल प्रदूषणही नकोच, प्रतिमा बनवणारे आणि विकणारे यासाठी काही पुढाकार घेतील का? चुकीच्या विसर्जनाचा दोष त्यांच्या माथी लागेल का?

फक्त पर्यावरणासाठीच नाही तर त्या प्रतिमेच्या सन्मानासाठी सुद्धा इको फ्रेंडली - पर्यावरणपूरक मूर्तींची गरज आहे - अधिकाधिक लोक गणेश स्थापना करू लागले आहेत - त्या सर्वानीच श्रींचे अथर्वशीर्ष शिकावे, या अथर्वशीर्षाचे सामुदायिक पठण गावोगावी व्हावे, त्या बरोबरीनेच आरत्या, भीमरूपी आणि समाज प्रबोधन असे सर्व व्हावे, पण कुठल्याही परिस्थितीत  श्रींच्या प्रतिमेचे योग्य प्रकारेच विसर्जन झाले पाहिजे,

पुढाकार आपण सर्वानीच घेतला पाहिजे, आपल्या घरापासूनच सुरवात केली पाहिजे - अशी मूर्ती आणून जी निसर्गात पूर्णपणे मिसळून जाईल - पर्यावरणाला कुठल्याही प्रकारे दूषित करणार नाही, अशा मूर्तींचे घरीच शुद्ध पाण्यात फुले टाकून आणि चंदन टाकून विसर्जन करावे, नंतर ते पवित्र पाणी आणि माती आपल्या बागेत किंवा आस पासच्या झाडांमध्ये टाकून द्यावी जेणेकरून झाडांच्या, फुलांच्या, फळांच्या आणि सावलीच्या रूपात श्री गणेश आपल्याला सदैव आशीर्वाद देत राहतील. जिथे जिथे आपल्याला चुकीच्या पद्धतीने विसर्जन होताना दिसेल तिथे तिथे आपण योग्य प्रकारे विसर्जन करण्याचा आग्रह, विनंती करू.

मी जेव्हा जेव्हा असे व्हिडिओ आणि फोटो बघतो तेव्हा मला प्रश्न पडतो कि का कुणीच या बद्दल बोलत नाही.

चितळ्यांची जाहिरात म्हणूनच भावते, सीड बॉल्स आणि शुद्ध मातीतुन बनलेली श्रींची मूर्ती बसवून नंतर त्याचे विसर्जन करून - त्यांना कुंड्यांतून सांभाळायचे आणि झाडं मोठी झाल्यावरहि त्यांना जोपासायचे - मला हि खूपच सुंदर अध्यात्मिक आणि सहज सोपी गोष्ट वाटली. आणि म्हणूनच हि जाहिरात हृदयाला भिडते.

भारताने आणि आपल्या सनातन हिंदू धर्माने अनेक आक्रमणे झेलली पण आपले अस्तित्व टिकवून ठेवले - यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे आपले अध्यात्म आणि आपली बदल स्वीकारायची क्षमता. जर आपली श्रद्धा भक्ती खरी आहे तर आपण सन्मानपूर्वक विसर्जनाचा आग्रह का नाही करू शकत?

श्री गणेश तर कणा कणात आहेत, आई वडिलांच्या सेवेची प्रेरणा ते देतात, श्री गणेश आपल्याला नेतृत्व गुण शिकवतात, आपल्या प्रत्येक आनंदाचा, उत्साहाचा आणि आपल्या उज्वल भविष्याचा शुभारंभ हा नेहमी श्री गणेश पूजनानेच होतो, होत राहिला आहे आणि होतच राहील...

चला आपणही योग्य रीतीने सन्मानपूर्वक विसर्जनाचा श्री गणेशा करूयात....


--------------------------------------------
HINDI
--------------------------------------------

चितले विज्ञापन, सन्मानपूर्वक विसर्जन .... एक नयी शुरुवात

श्री गणेशजी का उत्सव भारत में और विशेषतः महाराष्ट्र में बहोतही धूमधाम से मनाया जाता है, इतनाही नहीं जहा जहा सनातन हिन्दू धर्म को मानने वाले बसते है वहा वहा गणेशोत्सव मनाया जाता है.

मेरे खुद के घर पर भी श्री गणेशजी की स्थापना होती है. इस उत्सव के साथ मेरी अनेक प्यारी यादे जुडी है. कड़ी मेहनत से कम से कम एक महीना पहलेसेही सजावट की तैयारी करना, वह सब सामान लेने बाजार के चक्कर लगाना, घर साफ़ सफाई में सारे घर वालों का एक दूसरे को मदत करना, श्री गणेश चतुर्थी के एक दिन पहले तो घर में शादियों वाला माहौल बन जाता है - हर कोई तैयारी में लग जाता है - मोदक और दूसरे नैवेद्द्य / प्रसाद की तैयारी, फूल हार बनाना, आरती की तैयारी, रंगोली, पारम्परिक पोशाख , दूर्वा, कमल, और क्या क्या....... श्री गणेशजी की मंगल मूर्ति को अपने हातों से घर लाना एक अत्यंत आनंदमयी अनुभव होता है. वह सारे दिन अलग ही होते है - वह एक के बाद एक आरतिया और प्रसाद. वह खुद के घर की आरती, पड़ोसियों के यहाँ की फिर सोसाइटी की आरती. और फिर अलग अलग पंडालों में जाकर वहा की सजावट देखना और श्री गणेशजी के अनेक रूपों का दर्शन करना.

इस उत्सव ने कितनेही नेता दिए जो बचपन से उत्सव आयोजय करके नेतृत्व करना सीखे, इस उत्सव ने अनेक कलाकार दिए जिन्होंने इस उत्सव के दौरान अपनी सोसाइटी में, अपनी कॉलोनी में या अपने मित्र परिवारों के सामने अपनी कला का प्रदर्शन कर प्रोत्साहन पाया और आगे बढे, इस उत्सव ने शुरू से ही समाज के कल्याण का, समाज की एकता का काम किया.

केवल कुछ परिवारों में, या समुदाय में मनाया जाने वाला यह पारम्परिक व्रत लोकमान्य तिलक ने सार्वजनिक कर दिया. परतंत्र के काल में ब्रिटिश लोग हम भारतीयोंपर अनेक पाबन्दी लगाते थे. लोगों को इकठ्ठा कर क्रांति की, आज़ादी की बात करना भी मुश्किल था किन्तु श्री लोकमान्य तिलक ने श्री गणेश उत्सव को सार्वजनिक कर इस उत्सव के अवसर पर एकत्रित हुए सभी भारतीय जनता के मन में क्रांति की ज्योति जलाई, सब को आज़ादी पर बात करना और उसके लिए काम करने पर प्रेरित किया.

लेकिन, पिछले कुछ वर्षो से यह उत्सव बदल रहा है, बदलाव एक अनंत कभी ना थमने वाली चीज़ है. कुछ बदलाव अच्छे होते है तो कुछ बुरे. इस उत्सव के भी हजारों अच्छे अंग है तो कुछ ऐसी बाते है जिन पर हमें सोच विचार करना चाहिए और अच्छा बदलाव लाना चाहिए. सबसे दुःख दायक अगर कोई बात है तो वह ये की गलत तरीके से हो रहा विसर्जन.

यह बात अत्यंत संवेदनशील है.

मेरा किसी की भी धार्मिक भावनाओ को दुखाने का उद्देश्य नहीं है. मै खुद ही दुखी हूँ, आहत हूँ. इसका कारण यह है की पिछले कुछ सालों से हम सब विसर्जन के गलत तरीको को देख रहे है. हर वर्ष गणेश उत्सव के दौरान या बाद में विचलित करने वाली तस्वीरें आती है, वीडिओज़ शेयर किये जाते है. मैंने एक वीडियो देखा था जहा म्युनिसिपल कारपोरेशन के कर्मचारी सारी गणेश प्रतिमाओंको एक ट्रक में डाल कर एक पूल पर ले गए और वहा से उन्होंने प्रतिमाये नदी में डाल दी. मुंबई के समुद्रतटपरभी विसर्जन के बाद ऐसे ही दृश्य देखने मिलते है जहा प्रतिमाये टूटी हुई अवस्था में पड़ी रहती है. नदी या तालाब के किनारो पर भी ऐसा ही मिलता जुलता दृश्य दिखाई देता है. उत्तर भारत में तो अगर पानी आस पास नहीं है तो सीधे किसी पीपल के पेड़ के निचे इन प्रतिमाओंको छोड़ दिया जाता है. और यह सब देख कर मेरा मन विचलित हो जाता है. क्या यह सही है?
https://youtu.be/hFCByrlKvNA 
https://youtu.be/QbLfvTztE10

अगर हम पिछले पचास या सौ वर्षो को देखे तो यह साफ़ दिखेगा की श्री गणेश उत्सव जोकि एक व्रत है, एक पूजा है जो कुछ परिवार या समुदाय अपनी परंपरा के अनुसार मनाते  थे वही व्रत आज बहोत ज्यादा लोग अपनी श्रद्धा, अपनी ख़ुशी के लिए मनाते  है - यह अच्छी बात तो है लेकिन यह देखना जरुरी है की क्या हम इसे सही रूप से और सही तरीके से मना रहे है या नहीं?

अगर हमे श्री गणेश के पूजन का पुण्य मिलता है, फल मिलता है तो क्या हम गलत तरीके से विसर्जन कर के कही उस फल को खो तो नहीं देते? क्या हमे दोष तो नहीं लगता.

श्री गणेश का यह व्रत बहोत ही लाभदायक है, पुण्यदायक है - जो ये करते है उन्हें बरकत ही मिलती है, यश मिलता है, उनके भंडारे भर जाते है. पर कही गलत तरीके के विसर्जन से हम अपनी पूजा पर पानी तो नहीं फेर देते?

अपने घर में जो मंदिर में गणेश जी की धातु की प्रतिमा होती है उसके साथ ही - केवल इस उत्सव के दौरान भाद्रपद चतुर्थी को पार्थिव गणेश प्रतिमा की स्थापना की जाती है  (पार्थिव अर्थात मिटटी से बनी हुई) और इस प्रतिमा में प्राण प्रतिष्ठा के बाद श्री गणेशजी के चैतन्य रूप के आगमन की भावना रखते हुए उनकी श्रद्धा पूर्वक पूजा अर्चना की जाती है, डेढ़ दिन के बाद मतलब दूसरे दिन माधान्य में विसर्जन होता है, विसर्जन के पूर्व इस प्रतिमा की पूजा की जाती है इस भावना से की जो चैतन्य इस प्रतिमा में विराजित है वह हमें आशीर्वाद देकर अब वापस जा रहा है, अगले साल फिर से लौट आने के लिए - यही तो सृष्टि का चलन है - अनंत चक्र है. पंच महाभूतों से हम सब बने है और अंत में हम उन्ही पंचमहाभूतों में विलीन हो जाते है - वैसे ही निसर्ग से ही वह प्रतिमा बनती है और निसर्ग में ही विलीन हो जाती है, पूर्वकाल में इस व्रत को मनाने वाले कड़े नियमो का पालन करते थे ताकि पूजा में कोई त्रुटि ना रहे और पूरी ईमानदारी, निष्ठां से वह इस व्रत को पूरा करते थे, इसमें अपार श्रद्धा, भक्ति और प्रेम होता था. कालांतर से डेढ़ दिन का व्रत कई लोग तीन का, पांच दिन का, सात दिन का या दस दिन के त्यौहार के रूप में मनाने लगे. जो की अपनी श्रद्धा और परंपरा के अनुसार ही है. श्री गणेशजी तो लोकनायक है - गौरीपुत्र यह नहीं देखते की कितने दिन उत्सव मनाया, कैसे मनाया वह तो श्रद्धा देखते है और अपने सच्चे भक्तो को हमेश आशीष देते है, यश देते है - उनकी रक्षा करते है.
क्या आज भी हम सब में वही प्रेम, श्रद्धा, भक्ति है? मेरा मानना है की अवश्य है. हम सब आज भी श्री गणेशजी और हमारे सनातन हिन्दू धर्म में अपार श्रद्धा विश्वास रखते है. फिर कुछ अच्छे बदलाव के लिए हम कुछ क्यों नहीं करते?

क्या हम सब श्री गणेश के सन्मान पूर्वक विसर्जन के लिए कुछ नहीं कर सकते? हम क्यों जिद करते है बड़ी बड़ी प्रतिमाओंकी? उन पर लगे केमिकल से भरे रंगो की? और फिर उन्ही प्रतिमाओंको हम नदी में, तालाब में, सागर में, यहाँ तक की अशुद्ध पानी में - पीपल के निचे रख देते है, पूल पर से निचे दाल देते है, सरकारी कर्मचारी उन्हें ठीक से नहीं विसर्जित करते है  - क्या यह सही है?

हमें श्री गणेश उत्सव में कोई कमी नहीं रखनी चाहिए, ढोल हो - रंगोली हो - तरह तरह के पकवान हो - पूजा हो - हवन हो - आरती हो - कला प्रदर्शन हो - पर विसर्जन के नाम पर प्रतिमाओं का अपमान ना हो - जल का प्रदुषण ना हो. प्रतिमाओं के व्यवसाय करनेवाले क्या प्रतिमा विसर्जन की जिम्मेदारी लेंगे? क्या वह गलत तरीके से होने वाले विसर्जन का दोष अपने माथे पर लेंगे?

प्रतिमाये इको फ्रेंडली होना केवल पर्यावरण के लिए जरुरी नहीं है - उन प्रतिमाओं का उन मूर्तियोंका अपमान ना हो इसलिए भी जरुरी है. ज्यादा से ज्यादा लोग श्री गणेश की स्थापना करने लगे है, उन सबको श्री गणेश अथर्वशीर्ष सीखना चाहिए, श्री गणेश अथर्वशीर्ष का सामुदायिक पठन हर एक गांव और शहर में होना चाहिए, साथ ही मै आरती, हनुमान चालीसा और समाज प्रबोधन की भी बाते हो, पर किसी भी हालत में श्री प्रतिमाओंका गलत तरीके से विसर्जन ना हो.

पहल हम सब को करनी है. प्रथम अपने घर में हमें यह निश्चित करना है की हम इको फ्रैंडली याने पूरी तरह से निसर्ग में वापिस विलीन होने वाली - पर्यावरण को किसी भी तरह से  हानि ना पहुंचने वाली ही मूर्ति लाएंगे. और अपने घर के शुद्ध अभिमंत्रित फूल और चन्दन डाले हुए पानी में ही विसर्जन करेंगे. बाद में उस पवित्र मिटटी और पानी को अपने बाग़ में या आस पास के पेड़ो में डाल देंगे जिससे श्री गणेश उन पेड़ पौधों, फूलो फलो में से हमें सदा आशीर्वाद देते रहे - अपनी कृपा छाया हम पर बरसाते रहे. और जहा जहा गलत तरीके से विसर्जन हो रहा है वहा हम प्रार्थना करेंगे, आग्रह करेंगे की सही तरीके से विसर्जन करे.

जब जब मै ऐसे वीडिओज़ या फोटो देखता हु जहा पर अत्यंत गलत तरीके से विसर्जन हो रहा है तब तब दुःख होता है और लगता है की क्यों कोई कुछ नहीं कहता?

चितले बंधू मिठाईवाले इनका बहोत ही सुन्दर विज्ञापन है, जहा पर सीड बॉल्स से भरी शुद्ध मिटटी की गणेश प्रतिमा बिठाकर पूजा के बाद विसर्जन कर उस मिट्टी को गमलों में संभाल कर रखने की बात की गयी है, और फिर उसमे से उगे पेड़ों को संजोये रखना एक बहोत ही बड़ी अध्यात्म पूर्ण, पर्यावरणप्रेमी - सहज और सुन्दर बात है - जो मन को छू लेती है.

भारत ने और हमारे सनातन हिन्दू धर्म ने कितने आक्रमण झेले है, फिर भी हमारी हस्ती, हमारा अस्तित्व नहीं मिटा, इसका सबसे बड़ा कारण है हमारा अध्यात्म और हमारी बदलाव को अपनाने की क्षमता - अगर हम सच्ची श्रद्धा भक्ति रखते है तो क्या हम सही तरीके से सन्मान पूर्वक विसर्जन का आग्रह नहीं कर सकते?

श्री गणेश तो कण कण में है, उनसे हमें माता पिता की सेवा की प्रेरणा मिलती है, उनसे हमें नेतृत्व की सीख मिलती है. हमारे हर उत्साह का, हमारे हर आनंद का और हमारे सब के उज्वल भविष्य का शुभारंभ ही श्री गणेश पूजन से होता है, होता रहा है और आगे भी होता रहेगा.....

चलिए हम सही तरीके से सन्मान पूर्वक विसर्जन का श्री गणेश करे.....

काला पानी

हम सभी लॉक डाउन में बंद है. ये सही समय है जानने का , सोचने का उनके बारे में जिन्हे पुरे जीवन के लिए लॉक डाउन किया गया था. वो भी ए...