काय? तुम्ही अजून 'तानाजी' नाही बघितला?




'तानाजी' बघितला का हो तुम्ही? बघताना अभिमान, आनंद वाटलाच असेल नाही का? आणि नसेल बघितला अजून तर लगेच जा आणि बघा, तुमच्या जवळच्या सगळ्यांनाच बघायला सांगा. का? एका सिनेमा साठी इतकं भावुक का व्हायचंमग हे बघा….



“#ThanksMughals trends to protest ‘vilification’ after ‘Tanhaji; Trailer
Several users argued that Mughals were always vilified and that the Mughals were intrinsic members of Indian society.

तानाजी चा ट्रेलर आल्यावर लगेच सो कॉल्ड सेक्युलर, खान मार्केट गॅंग, तुकडे तुकडे गॅंग, अँटी इंडिया गॅंग सगळेच चवताळून उठले आणि त्यांनी #थँक्स मुघल हा हॅशटॅग ट्रेंड सुरु केला, तानाजीच्या नुसत्या ट्रेलरनेच त्यांना किती अस्वस्थ केलं. आपण जोधा अकबर बघितला, आपण या पूर्वीही अनेक मुघलांचे गुणगान गाणारे सिनेमे बघितले ताजमहाल असो किंवा मुगले-आझम  आपण खेळकर पणे सगळं स्वीकारतो. पण या गॅंगला तानाजी बघवत नाहीये. तानाजीचा नुसता ट्रेलर बघून यांना पोटदुखी सुरु झाली. ज्या मुघलांनी हजारो मंदिर तोडले, हिंदूंवर झिझिया कर म्हणजे जगण्यासाठी द्यायचा कर लावला, शीख धर्मगुरूंची निर्घृण हत्या केली, करोडो हिंदूंचे धर्म परिवर्तन केले, ज्या मुघलांविरुद्ध मराठे, राजपूत, शीख सर्वस्व पणाला लावून लढले त्या मुघलांना धन्यवाद देणारा #थँक्स मुघल हा ट्रेंड या गॅंग ने सुरु केला, फक्त तानाजीचा ट्रेलर बघून.

आणि तानाजी सिनेमा प्रदर्शित झाल्यावर तर विचारूच नका. हि मुघलगुलाम मंडळी इतकी दुखावली आहेत कि तानाजी बघणाऱ्यांना वाटेल ते बोलत सुटली आहेत. हे बघा क्विन्ट आणि द वायर काय म्हणताहेत.


The Quint: Tanhaji, The Unsung Warrior is the latest in the slew of Islamophobic period films coming out of Bollywood in recent years


The Wire: ‘Tanhaji’ Review: Propaganda Weighs Down an Already Mediocre Film. Less of a feature film and more of a presentation to Modi and Amit Shah to realise their deeply egregious ideas about India. ‘Tanhaji’ tells a deeply divisive story when the country is on the brink of getting torn.     

द वायर ने तर कहरच केलाय, ते म्हणताहेत कि तानाजी हा सिनेमा मोदी आणि अमित शहांची स्वप्नपूर्ती आहे. ते म्हणताहेत कि तानाजी सिनेमा देशात दुफळी माजवण्यात हातभार लावतोय - म्हणजे मुघलांनी भारतीयांवर केलेले आक्रमणचा ह्यांना मान्य नाही, सत्य इतिहास स्वीकारण्यास यांची तयारी नाही. फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशनच्या नावाखाली हे स्वतः वाटेल ते करणार - मग एम एफ हुसेन ने हिंदू देवतांची वाटेल तशी चित्र काढायची, अगदी सेक्सी दुर्गा नावाचा चित्रपट हि काढायचा, बॉलीवूड वाल्यानी हिंदू आणि हिंदूंच्या सण परंपरांवर वाट्टेल ते बोलायचं पण जरा मुघलांच सत्य बाहेर आलं कि हेच लोक मग सामाजिक सौहार्दाच्या गोष्टी सांगणार.

मुळात मुघलांनी बाहेरून येऊन भारतीयांवर अत्याचार केले हेच त्यांना मान्य नाही, त्यांचा तर अगदी माय भवानी गाण्यावर आक्षेप आहे, औरंगझेबाची क्रूर प्रतिमा त्यांना जगापासून लपवून ठेवायची आहे आणि त्याचे गोडवे गायचे आहेत, आजही सिबीएससी च्या अभ्यासक्रमात अकबर कसा महान होता हेच मुलांना शिकवले जाते, अगदी भाजप सरकार सुद्धा हा अभ्यासक्रम बदलू शकत नाही कारण मग भगवाकरण केल्याचे त्यांच्यावर आरोप होतील.

म्हणून आपण तानाजी सिनेमा बघितलाच पाहिजे आणि इतरांना तो बघण्यास सांगितले पाहिजे, एकतर त्यामुळे अशा चित्रपटांना मदत होईल आणि अधिकाधिक कलाकार असे चित्रपट काढतील. सर्व प्रकारच्या प्रेक्षकांना आवडेल असा चित्रपट काढणं म्हणजे तारेवरची कसरतच, सर्व स्तरातील लोकांना आवडेल - सर्व वयोगटातील लोकांना आवडेल असं काही निर्माण करायचं म्हणजे काही साधी गोष्ट नाही आणि हे तानाजी च्या निर्मात्यांना जमलं आहे, त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडच. 

"शिवाजी महाराजांची तलवार स्त्रियांचे शील आणि ब्राम्हणांचे जानवे संरक्षित करते" असा एक डायलॉग होता ह्या सिनेमात , हे ऐतिहासिक सत्य आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हिंदूंच्या अब्रूचे, धर्माचे, प्राणाचे आणि संपत्तीचे रक्षण झाले हे सत्य आहे पण हा डायलॉग बदलावा लागला. जानव्याचा उल्लेख टाळण्यात आला. असो.... तरीही तानाजी चे संवाद अतिशय परिणाम कारक आहेत. सुंदर आहेत. जोश आणणारे आणि अभिमान वाटावा असेच आहेत.


दुर्दैवाने आजही भारतात मुघलगुलामांची कमी नाही, आजही ब्रिटिश सत्तेच्या हँगओव्हर मध्ये जगणारे अनेक आपल्या भारतात आहेतं, ब्रिटिश कालीन शिक्षण तज्ज्ञ मेकाले ने भारतीयांना भारतीयत्वा पासून तोडण्यासाठी जी शिक्षण पद्धती तयार केली त्याची फळं सगळी कडे दिसून येतात - तेच हे लोक ज्यांना भारतीयत्व नको आहे, हिंदुत्व नको आहे. जे जे या प्राचीन सनातन धर्माची महानता सिद्ध करतात त्या सगळ्यांशीच या लोकांना वैर आहे. आणि म्हणून आपण तानाजी बघितला पाहिजे. सरकार हा चित्रपट टॅक्स फ्री करो व ना करो.

काला पानी

हम सभी लॉक डाउन में बंद है. ये सही समय है जानने का , सोचने का उनके बारे में जिन्हे पुरे जीवन के लिए लॉक डाउन किया गया था. वो भी ए...