CHAVA: Part 2 Shree Ramdas Swami’s eternal letter…..







Please do read CHAVA, our children must read CHAVA. Book is available in Marathi, Hindi & English.

After first article on Mahasati Rani Putalabai – this second article is on Shree Ramdas Swami’s eternal letter….. which also included in this great book. My article is in Marathi & English.

छावा  नक्कीच वाचला पाहिजे. आपण आपल्या मुलांना वाचायलाच लावल पाहिजे. या लेखाच्या पहिल्या भागात महासती राणी पुतळाबाईंवर लिहिल होत, हा दुसरा लेख श्री समर्थ रामदास स्वामींच्या अजरामर पत्रावर आहे.


निश्चयाचा महामेरु बहुत जनांसी आधारु अखंड स्थितीचा निर्धारु श्रीमंत योगी
परोपकाराचिये राशी उदंड घडती जयासी तयाचे गुणमहत्त्वासी तुळणा कैची
यशवन्त कीर्तिवन्त सामर्थ्यवंत वरदवन्त नीतिवन्त पुण्यवंत जाणता राजा
आचारशीळ विचारशीळ दानशीळ धर्मशीळ सर्वज्ञपणे सुशीळ सकळां ठायी
नरपति हयपति गजपति गडपति भूपति जळपति पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागीं
धीर उदार गंभीर शूर क्रियेसि तत्पर सावधपणे नृपवर तुच्छ केले
तीर्थेक्षेत्रे मोडिली ब्राह्मणस्थाने भ्रष्ट जाली सकळ पृथ्वी आंदोळली धर्म गेला
देव-धर्म-गोब्राह्मण करावया संरक्षण हृदयस्थ जाला नारायण प्रेरणा केली
उदंड पंडित पुराणिक कवीश्वर याज्ञिक वैदिक धूर्त तार्किक सभानायक तुमच्या ठायी
या भूमंडळाचे ठायी धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्रधर्म राहिला काही तुम्हां कारणे
आणिकही धर्मकृत्ये चालती आश्रित होऊन कित्येक राहती धन्य धन्य तुमची कीर्ती विश्वीं विस्तारिली
कित्येक दुष्ट संहारिला कित्येकांसी धाक सुटला कित्येकांस आश्रयो ज़ाहला शिवकल्याण राजा
तुमचे देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले ऋणानुबंधे विस्मरण जाले काय नेणो
सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती सांगणे काय तुम्हाप्रती धर्मसंस्थापनेची कीर्ती सांभाळिली पाहिजे
उदंड राजकारण तटले तेणे चित्त विभागले प्रसंग नसता लिहिले क्षमा केली पाहिजे

This letter from year 1672 sent by Shree Samarth Ramdas Swami to Shree Chatrapati Shivaji Maharaj contents the best portrayal of Maharaj. It also talks about the social & political situation during that time. As a Guru – Shree Samarth Ramdas Swami also urge Maharaj to protect the Dharma….

The letter says
‘Great King you have the ability to take the courageous decisions and remain firm on them, there are so many of us around for whom your are a great support – you are our guardian, your strong selfless commitment towards the welfare of people makes you a monk, great king though you are so wealthy just because of your sacrifices & chosen hardship you are no less than a monk.
You have been so generous and so helpful to others that we cannot compare your big-heartedness with anyone else of our time, your good qualities are incredible.
You are successful, you are legendary, you are mighty, you are powerful, you are always generous & compassionate, you are virtuous, you have always done good deeds, oh King you are the true ruler who know the real duties & responsibilities of the ruler and you fulfil them religiously – you are a sagacious ruler.   
You are graceful & perfect in royal etiquettes, you are thoughtful in all the situations, you unconditionally bestow wealth & help to needy ones, you are pious, you are highly knowledgeable and humble.
You are a true leader of people, you truly deserve all your possessions of prosperity let it be your royal elephant or wealth, you are the victor who has won & built the forts on land, mountain & ocean. The Goddess of power Shakti has blessed you and made you powerful.
You have great patience, you are courageous & generous and you are elegant, we appreciate your wisdom & sincerity. You are brave and never hesitate in taking onus, action & responsibility, your alertness is supreme.
Oh King…. The religious places of Hindus are being destroyed by invaders, the spiritual & unarmed Hindu sages are being tortured by these enemies of mankind, our own motherland is becoming an alien land for Hindus. Is this the end of our eternal sanatan Dharma?
You must protect our heritage, cows – temples & sages are the symbol of our culture protect them – you are here to protect all of us, you are the protector of our ancient Dharma. The almighty – supreme god – Narayan who resides within us is giving inspiration to you and me.
You have all of them in your royal court – the wise councilors, spiritual mentors, poets, policy makers, religious pious men. They are astute, they are capable. However there is no one who can protect our Dharma – whatever of our Dharma is left – it is just surviving because of only you.
Under your protection our religious activities are still going on – where will we all go without you. We admire you for this and you are famous because of this. All over the world people appreciate you because of this.
You have destroyed so many enemies of our society, and there are so many enemies still there they have no courage to fight with you, oh king of people – there are so many innocent people who are happily living in your shelter. Oh sagacious king you are a godly lifesaver of public, in your rule common public has become prosperous & joyous.
I am staying in your kingdom however we did not get an opportunity to meet so far, as if we have forgotten our spiritual connection with each other, I don’t know why.
What should I tell you – you know & understand everything. You must successfully maintain the responsibility of protecting & reestablishing our Dharma, do everything possible to achieve this goal. Do not get distracted due to non worthy internal disputes which may deviate you from your auspicious path and hence I thought of reminding you of your ultimate purpose & duty. Forgive me for my uncalled advice.

श्री समर्थ रामदास स्वामी यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना सन 1672 मध्ये लिहिलेलं हे पत्र, यात महाराजांचे सर्वोत्तम चित्रण आहे. त्या काळातील सामाजिक स्थिति बद्दल हि आपल्याला यातून कल्पना मिळते. गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांना त्यांच्या धर्मसंरक्षणाच्या कर्तव्याचे स्मरण करून देतात.
पत्र
' हे महान राजा, तुझ्याकडे कठोर निर्णय घेण्याची आणि त्यांच्यावर दृढ राहण्याची क्षमता आहे, लाखो जणांचा तू आधार आहेस, रयतेचा तू पालक आहेस. निस्वार्थी वृत्तीने राज्य करणारा परोपकारी असा राजा - मला तू वैराग्यवृत्तीचा आणि सर्व ऐश्वर्याने संपन्न असणारा श्रीमंत योगीच वाटतो.
तू इतरांवर अगणित उपकार केलेले आहेस, तुझ्या गुणांची तुलना कुणी करावी ? अतुलनीय गुणवंत असा तू महान सदगुणी राजा आहेस.
यशस्वी आणि पराक्रमी तर तू आहेसच पण अति सामर्थ्यशाली असूनही तू अत्यंत उदार आणि कृपाळू आहेस. सतचरित्राचा नीतिमान राजा - तूला रयतेच्या सुख दुःखांची जाण आहे - हे राजा तू एक जाणता राजा आहेस.
सर्वोत्तम आचारांचा, अत्यंत विचारशील राजा तू अत्यंत दानशूर आहेस धार्मिक आहेस. अत्यंत ज्ञानी असूनही नम्रपणे तू सगळ्याची मने जिंकून घेतोस.
हत्ती बाळगणाऱ्या, वीर पुरुषांच्या नेत्या - सर्व ऐश्वर्य लक्षणे तुला शोभून दिसतात - उलट तुझ्या मुळेच त्यांना शोभा येते. जमीन, डोंगर आणि समुद्र या सर्वांवर तू गड किल्ले बांधून अधिपत्य स्थापित केले आहेस. किल्ले जिंकून घेणाऱ्या राजा - शक्ती देवतेने तुला वर देउन सामर्थ्यसंपन्न केले आहे.

पराक्रमी निर्भीड आणि उदार राजा, तू सदैव कर्तव्यपरायण असतोस, कधीही निष्क्रिय नसतोस. तुझ्या सावधपणामुळे तुझे यश वाढले आहे.

आपली पवित्र तीर्थक्षेत्रे उध्वस्त केली जात आहेत, धर्मपरायण लोकांचा छळ केला जातो आहे. आपलीच मातृभूमी आपल्या प्राचीन सनातन धर्माला पारखी होते कि काय अशी परिस्थिती आहे.

हे राजा - आपल्या धर्माचे रक्षण कर, गो ब्रह्मण प्रतिपालक राजा तुझ्या आणि माझ्या हृदयात बसणारा नारायण आपल्याला हीच प्रेरणा देतो आहे.
तुझ्या कडे गुणी लोकांची कमी नाही, तुझ्या दरबारात अनेक शूर, विद्वान, धर्मपंडित, राजकारणधुरंदर लोक आहेत. पण या जगात मला तुझ्या सारखा इतर कुणीही दिसत नाही हो आपल्या धर्माचे रक्षण करेल. जो काही आपला महान धर्म राहिला आहे तो केवळ तुझ्याच मुळे. 
तुझ्या मुळेच थोडेफार धर्मकृत्य इथे चालू आहे, तुझ्या आश्रयाने अनेक जण सुरक्षित आहेत. म्हणूनच तुझी कीर्ती सगळीकडे पसरत आहे.
तू अनेक शत्रूंचा संहार केलास. आणि अनेकांना तुझा धाक बसवलास. भोळीभाबडी जनता तुझ्या संरक्षणाखाली सुरक्षित आहे. रयतेचे भले करणाऱ्या राजा तू शिवकल्याण राजा आहेस.
तुझ्या राज्यात राहूनही आज पर्यंत आपण भेटलो नाही - आपण आपले जुने ऋणानुबंध विसरलो कि काय कोण जाणे - आपण भेटले पाहिजे.
तू सर्व जाणतोस - तुला काय सांगायचे?  धर्मसंरक्षणची आपली जबाबदारी सर्वोपरी आहे ती कधीच दुय्यम होऊ देऊ नको. तुझ्या आजूबाजूला अखंड राजकारण चालूच राहणार पण त्यामुळे तुझा मार्ग भटकू देऊ नकोस - मागता उपदेश केल्या बद्दल क्षमा असावी.


CHAVA: Shivputra Shree Sambhaji Raaje - शिवपुत्र श्री संभाजी राजे (Part One: Maharani Sati Putalabai भाग पहिला: महाराणी सती पुतळाबाई),



(Article is in Marathi & English – on the same page, just scroll down for English)

शिवपुत्र श्री संभाजी राजे (भाग पहिला: महाराणी सती पुतळाबाई)

श्री शिवाजी सावंत यांचे मराठी साहित्यात अनमोल योगदान आहे. त्यांच्या मृत्युंजय, छावा, युगंधर या कादंबऱ्या चिरंतन, सुंदर आणि पवित्र आहेत. प्रत्येक भारतीयाने हि पुस्तके विकत घेतली पाहिजेत आणि वाचली पाहिजेत. आपल्या मुलांना शाळांमधून आपले खरे भारतीय शूरवीर फार कमी शिकवले जातात आणि परकीय आक्रमक मुघलांचे गुणगान शालेय अभ्यासक्रमातून होते हि शरमेची गोष्ट आहे. आपणच छावा सारखी पुस्तके वाचली पाहिजेत आणि इतरांना ती वाचण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.

छावा मध्ये श्री संभाजी राजांच्या तेजस्वी उदात्त जीवनाचा कालखंड आहे. (१६५७ ते १६८९). एका उदार मनाच्या पराक्रमी लढवैय्या कवीची हि प्रेरणादायी गोष्ट. प्रत्येक बाबतीत श्री संभाजी राजे हे महादेव रुद्रासारखेच आहेत - महा शक्तिशाली, अति उदार, अतिशय देखणे, कलाप्रेमी, पराक्रमी आणि खऱ्या अर्थाने एक आदर्श भारतीय योद्धा.

मी छावा अनेक वेळा वाचलेलं आहे. छावा म्हणजे - सिंहपुत्र. खरोखरच श्री शिवाजी महाराजां सारख्या सिंहाचे पुत्र श्री संभाजी राजे यांना छावा हि उपाधी शोभून दिसते.  हे पुस्तक आपल्याला अगदी साक्षात त्या कालखंडात घेऊन जाते. जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपण त्याच काळात आहोत असे वाटते. या पुस्तकातील प्रत्येक पात्राचे व्यक्तिचित्रण अतिशय प्रामाणिक आणि भुरळ पडणारे आहे, आणि हेच लेखकाचे खूप मोठे यश आहे.

इथे या लेखाचा पहिला भाग महाराणी सती पुतळाबाई यांना समर्पित आहे.

महाराणी सती पुतळाबाई या श्री शिवाजी महाराज यांच्या तृतीय पत्नी. त्या पालकर घराण्याच्या कन्या, १६५३ मध्ये त्यांचा विवाह झाला. पुढे त्या श्री शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर सती गेल्या. त्यांची निष्ठा, त्याग, संपूर्ण परिवाराला एकत्र धरून ठेवण्यासाठी केलेली धडपड, एक राणी, एक पत्नी आणि एक आई म्हणून त्यांनी बजावलेले कर्तव्य या सगळ्यांसाठीच त्या सदैव आदरास पात्र राहतील.

खर तर त्यांच्या सारख्या राणीलाच जास्त अधिकार मिळायला हवे होते. पण आपल्या परिवारातून आणि समाजातून सर्वोत्तम व्यक्तीलाच सर्वात जास्त त्याग करावा लागतो, नेहमीच. जर त्यांच्या सारख्या राणीला जास्त सत्ता आणि कार्यक्षेत्र मिळाले असते तर कदाचित इतिहास काहीसा वेगळाच असता. मंदिरातल्या समई आणि फुलांसारख्या त्या पवित्र आहेत, माता भवानी सारख्याच त्या भक्तांचे सारे अपराध पोटात घालून लेकरांना उदंड यश देणाऱ्या वाटतात.

पुस्तकात जेव्हा त्यांच्या सती जाण्याचा प्रसंग येतो आणि श्री संभाजी राजांबरोबर त्यांच्या शेवटच्या संभाषणचा प्रसंग आपण वाचतो तेव्हा आपल्याला काय वाटत हे शब्दात सांगायची माझी पात्रताच नाही. ते वाचताना काय आणि कस वाटलं हे मी सांगूच शकत नाही. एखाद्या योग्यासारखं, एखाद्या पराक्रमी लढवैय्या सारखं त्या सती गेल्या. देव आणि मानवाच्या केविलवाण्या आवाहनांना ऐकून पृथ्वीवर प्रगटलेल्या दुर्गादेवी सारख्या त्या भासतात. प्राचीन सनातन हिंदू धर्माची ज्योत सदैव तेवत ठेवणाऱ्या पवित्र अग्नी सारख्या त्या भासतात. पुत्र श्री संभाजी राजांच्याच हातून मुखाग्नी घेण्याचा त्या आग्रह करतात. उदार आणि पराक्रमी श्री संभाजी राजांसाठी किती कठीण प्रसंग असावा तो, पुत्र म्हणून हे धर्म कर्तव्य निभावताना काय वाटलं असेल राजांच्या मनाला. त्यांचे शेवटचे शब्द 'पुत्र आहात तुम्ही आमचे हे सदैव स्मरणात ठेवा' - मला हे मंत्रघोषच वाटतात.  सावत्र असूनही त्यांनी सदैव श्री संभाजी राजांना सख्या आई प्रमाणे सांभाळलं. त्यांच्यासाठी त्या सख्या मातोश्री महाराणी सईबाईंपेक्षा काही कमी नव्हत्या. मला वाटत महाराणी सती पुतळाबाईंचं हे सती रूप आणि हे शेवटचे बोल श्री संभाजी राजांच्या हृदयात कायमचे कोरले गेले असतील. शेवटी जेव्हा त्या माथेफिरू जिहादी औरंगझेबाने छळ करून राजांचा वध केला तेव्हाही राजांनी याच देवीसमान महाराणी सती पुतळाबाईंचे स्मरण केले असेल. त्या देवीच्या त्यागाने आणि सतीत्वाने त्यांना बाळ दिले त्यामुळे राजांनी पापी औरंगझेबाचे राजांना इस्लाम कबूल करावयास लावण्याचे प्रयत्न निष्फळ केले, उधळून लावले. शेवटी राजांनी प्राणत्याग केला पण पापी औरंगझेबापुढे त्यांनी हार मानली नाही - कारण महाराणी सती पुतळाबाईंनी शेवटी खरेच सांगितले होते ‘राजे एका पराक्रमी आणि पवित्र तेजस्वी आईचे पुत्र होते’.

श्री शिवाजी महाराज आणि महाराणी सती पुतळाबाईंचे पुत्र पराक्रमी योद्धे कवी श्री संभाजी राजे यांचे स्मरण करण्यासाठी आपण छावा हि कादंबरी वाचलीच पाहिजे.

----- भाग दुसरा लवकरच

Shivputra Shree Sambhaji Raaje Part One: Maharani Sati Putalabai Raje

Shree Shivaji Sawant has made incredible contributions in the Marathi literature. His novels ‘Mrityunjay’, ‘Yugandhar’ and ‘Chava’ are eternal, beautiful and pious. Every Indian must buy these books and read them. It’s a shame that our children do not get to read about our real heroes and they have to study the biased glories of the Mughal invaders. We must urge our people to read books like ‘Chava’.

Chava reveals the era from 1657 to 1689, the entire lifespan of Shree Sambhaji Raje is a luminous story of a great warrior poet who is kind hearted as well as brave among the bravest. In every sense he is like Mahadev Rudra – who is the most powerful, the most generous, the most handsome, the most artistic and a true Indian Hero.

I have read ‘Chava’ multiple times. ‘Chava’ means a lion cub. Indeed Shree Sambhaji Raje was a lion cub being a son of a great lion-like king Shree Shivaji Maharaj. The book literary takes us to that period. When we read we feel; as if we are part of that time. The portrayal of all the characters in this book is very sincere and mesmerizing and that is a great success of the writer.

Part one of this article is dedicated to Maharani Sati Putalabai

Maharani Sati Putalabai – was the third queen of Shree Shivaji Maharaj. She was married to him in the year 1653 and was from Palkar Family. She went sati in funeral pyre of Shree Shivaji Maharaj. Her devotion, her sacrifice, her efforts to take everybody in the family together and her commitment towards her responsibilities as a queen, as a wife and as a mother is praiseworthy even today.

A queen like her should have got more authority – isn’t this happen all the time in our families & society too that somebody who is earnest has to make all the sacrifices. If someone like her would have got more space & power then the history would have been different. She is as pious as a lamp & flowers in the temple, she is like a mother goddess Bhavani who forgives all the sins and in return bless her children with all possible boons. 

The chapter in the book when she went sati – that entire process and her last conversation with Shree Sambhaji Raje is an experience and realization beyond our capacity to explain. I fail to describe how & what I felt. She went sati with determination like a yogi & a warrior, she was like goddess Durga appearing on earth after listening to appeals of gods & humans – she was that fire which kept the light of the ancient sanaatan hindu dharma alive. She insisted to get the mukhagni from her son Shree Sambhaji Raje. How hard it would have been for the kindhearted and brave Shree Sambhaji Raje to perform that duty as a son. Her last words to him just before going sati – “always remember you are MY son” are not less than any mantra. Though she was Shree Sambhaji Raje’s step mother she always supported him as her own child. She was no less than his own mother Maharani Sai Bai. I believe Maharani Sati Putalabai’s last look as sati and her last words would have remained in Shree Sambhaji Raj’es heart forever. In end when the jihadi psycho Aurangazeb tortured Shree Sambhaji Raje till death – Raje must have remembered the godly Maharani Sati Putalabai. Her strength & sacrifice would have given him the power to fight and abolish the fruitless efforts of Aurangazeb to convert Raje to Islam. Shree Sambhaji Raje died in the end but he did not surrender to the sinner Aurangazeb, after all Maharani Sati Putalabai was right – Shree Sambhaji Raaje was the son of a courageous pious lady.

We must read ‘Chava’ to remember the great warrior poet Shree Sambhaji Raje son of Shree Shivaji Maharaj and Maharani Sati Putalabai.

--- next part coming soon

Kosala


Kosala means cocoon, in 1963 Shree Bhalchandra Nemade wrote this Marathi novel ‘Kosala’. Even today in 2019 Kosala remains relevant and it is it’s one of the biggest strengths. In Kosala many readers have found different meanings in many different ways.

In the very beginning of the book, Nemade has dedicated this book to "all the 99 out of 100 people" and I agree to that, the main character of this novel indeed represents the 99% people of the society.

In reality, just like the main character of Kosala a large majority of youngsters do waste a lot of time in the most crucial years when they are between 16 to 25 years of age – as they struggle to decide and identify the path on which they want to walk in future, it is crucial phase of their life when they are about to decide their future, their career, their life style, their goals…… for most of us this phase is a combination of our dreams, challenges and the circumstances around us, however many times due to laziness, due to unnecessary stubbornness, due to our doubts  on the intelligence of our well-wishers and our disagreements with our parents & family we waste a lot of time.

However, this entire process of struggle makes few people stronger & better – eventually they are able to identify a deserving goal and are able to walk towards it, where as there are few who get completely lost and just get dragged towards something which they never planned or wished for themselves. If they would have taken some extra efforts, or would have remained patient and would have listened to their well-wishers then there would have some possibility of them being on a better path.  In Kosala the main character finds his own way…. Anyways as its mentioned in the beginning it is the story of 99% people in our society. There are always those 1% people who are able to fight against all the odds & are able to achieve something extraordinary which always remains beyond the reach of common people.

Even our preferences, opinions & liking get changed over the period of time, the main character of Kosala eventually avoid his best friend – its sad to read how the main character decides not to meet his best friend even when his friend is about to leave for forever to a different city, though there is no possibility of them being able to meet again and though his best friend does everything possible to meet him for the last time our main character of Kosala decides not to meet him even for once.

It does happen with all of us many times that someone who was very dear to us for a long time in life, someone whom we loved, we put all our trust, the same person over the period of time becomes a stranger or an absolutely different person. The more we know that person the more we start creating a distance from him or her which is completely against our own behavior which was there at the beginning of our interactions with that person. The most hurting part of such relations is this that when we realize that we are not as important or as significant for that person as that person is to us and it really shatters us…..

The chapter where the younger sister of Kosala’s main character dies…. It disturbs us to the core. Death is as inevitable as it is mysterious. And no one so far is been able to resolve this mystery, this is indeed a very big topic itself for everyone to think…..

Kosala is unique in many ways… and everyone who reads it will find something unique. Have you read Kosala?

Marathi: Kosala by Bhalchandra Nemade
Translations
Hindi: Kosala by Bhagwandas Verma
Gujarati: Kosheto by Usha Sheth
Kannada: Kosala by Vaman Bendre
Punjabi: Kosala by Ajeet Singh
Asamiya: Palur Vaah by Kishorimohan Sharma
English: Cocoon by Sudhakar Marathe
Bengali: Need by Vandana Hajra
Urdu: Kosala by Musharraf Alam Jauki
Oriya: Koshapok by Cheershree Indrasingh


कोसला

कोसला म्हणजे कोष.... १९६३ मध्ये श्री भालचंद्र नेमाडेंनी कोसला हि कादंबरी लिहिली. आज २०१९ मध्ये यावर लिहिण्याचं कारण हेच कि आजही हि कादंबरी मनाला खूप भावते. अनेक वाचकांना अनेक वेग वेगळे अर्थ यातून सापडले असतील, जसं व्यक्ती तितक्या प्रकृती तसाच जितके वाचक तितकीच मतं.  

पुस्तकाच्या सुरवातीलाच नेमाडेंनी लिहिल आहे "शंभरातल्या नव्याणव जणांसाठी" आणि मला हे अगदी पटलं. एका नवयुवकाची आयुष्याची दिशा शोधण्याची धडपड आणि हातात साधन असूनही, संधी असूनही कुठेतरी आळस, अतिविचारं, चुकीचे निर्णय, चुकीची सोबत आणि आई वडीलांसारख्या हितचिंतकांशी मतभेद यामुळे तरुण मुलं ऐन उमेदीच्या काळातला खूप वेळ अक्षरशः वाया घालवतात. या शोध प्रक्रियेत काही जण चांगले घुसळून निघतात - तयार होतात आणि सुरवातीला वेळ गेला तरी त्यांना नंतर फायदाच होतो पण काही जण मात्र आपली दिशा हरवून बसतात आणि कायमचाच मार्ग भटकतात. सुदैवानं कोसला च्या कथानायकाला मार्ग सापडतो पण हेही खरंच कि हि कहाणी "शंभरातल्या नव्याणव जणांसाठी" आहे आणि शंभरातला एखादाच किंवा एखादीच सगळ्या प्रतिकूल परिस्थिती वर मात करून जगावेगळं काहीतरी विशेष करून दाखवतात. 

मनाला चटका लावणाऱ्या काही गोष्टी यात आहेत आणि त्या आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत घडतात नाही का? अगदी जवळच्या मित्राला कथानायक शेवटचा म्हणून भेटत नाहीच, तो मित्र अनेक प्रयत्नही करतो पण एके काळी अति जिवलग असलेला मित्र नंतर कथानायकासाठी एकदा भेटण्याच्या पात्रतेचाही राहत नाही. असा होतं नाही का बऱ्याच वेळेला - आयुष्यातला एक काळ एखादी व्यक्ती आपल्याला खूप प्रिय असते, आपण खूप आदर करतो, विश्वास करतो किंवा प्रेम करतो त्या व्यक्तीवर पण जसा काळ जातो तस तसं त्या व्यक्तीची आपल्याला सगळीच रूपं दिसतात आणि आपल्याला ती व्यक्ती नकोशी होते. 

किंवा ज्या व्यक्तीला आपण सर्वस्व मानलं किंवा ज्या व्यक्तीवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवला किंवा जी व्यक्ती आपल्याला खूप खूप आवडते आणि नंतर जेव्हा हे कळतं कि त्या व्यक्ती साठी आपण मात्र तितकेसे महत्वाचे नाही तेव्हा मात्र आपण त्या व्यक्ती पासून आपसूकच खूप लांब निघून जातो... मनाने तर  नक्कीच. 

कथानायकाच्या धाकट्या बहिणीच्या मृत्यूची गोष्ट हि तशीच - मनाला दुखवून जाणारी, एकही नातेवाईक मेलेला नाही अशी व्यक्ती नाहीच पण मृत्यू समजलाय अशी एकही व्यक्ती मिळणार नाही, गूढ मृत्यू आणि त्याचं चिरंतन अस्तित्व - चिंतन करण्याचाच हा विषय. लेखकाचं गाव असो, परिवार असो, मित्र असो कि शिक्षक आणि समाजजीवन सगळंच कालानुरूप आज बदलेल आहे पन मूळ प्रश्न आणि मानवी स्वभाव आहे तसाच आहे. 

कोसला हा एक अनुभव आहे आणि वाचनप्रिय वाचकांनी त्याचा लाभ घ्यायलाच हवा. तुम्ही वाचलीये का कोसला? कशी वाटली हि कादंबरी तुम्हाला

काला पानी

हम सभी लॉक डाउन में बंद है. ये सही समय है जानने का , सोचने का उनके बारे में जिन्हे पुरे जीवन के लिए लॉक डाउन किया गया था. वो भी ए...