कोसला म्हणजे कोष.... १९६३ मध्ये श्री भालचंद्र नेमाडेंनी कोसला हि कादंबरी लिहिली. आज २०१९ मध्ये यावर लिहिण्याचं कारण हेच कि आजही हि कादंबरी मनाला खूप भावते. अनेक वाचकांना अनेक वेग वेगळे अर्थ यातून सापडले असतील, जसं व्यक्ती तितक्या प्रकृती तसाच जितके वाचक तितकीच मतं.
पुस्तकाच्या सुरवातीलाच नेमाडेंनी लिहिल आहे "शंभरातल्या नव्याणव जणांसाठी" आणि मला हे अगदी पटलं. एका नवयुवकाची आयुष्याची दिशा शोधण्याची धडपड आणि हातात साधन असूनही, संधी असूनही कुठेतरी आळस, अतिविचारं, चुकीचे निर्णय, चुकीची सोबत आणि आई वडीलांसारख्या हितचिंतकांशी मतभेद यामुळे तरुण मुलं ऐन उमेदीच्या काळातला खूप वेळ अक्षरशः वाया घालवतात. या शोध प्रक्रियेत काही जण चांगले घुसळून निघतात - तयार होतात आणि सुरवातीला वेळ गेला तरी त्यांना नंतर फायदाच होतो पण काही जण मात्र आपली दिशा हरवून बसतात आणि कायमचाच मार्ग भटकतात. सुदैवानं कोसला च्या कथानायकाला मार्ग सापडतो पण हेही खरंच कि हि कहाणी "शंभरातल्या नव्याणव जणांसाठी" आहे आणि शंभरातला एखादाच किंवा एखादीच सगळ्या प्रतिकूल परिस्थिती वर मात करून जगावेगळं काहीतरी विशेष करून दाखवतात.
मनाला चटका लावणाऱ्या काही गोष्टी यात आहेत आणि त्या आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत घडतात नाही का? अगदी जवळच्या मित्राला कथानायक शेवटचा म्हणून भेटत नाहीच, तो मित्र अनेक प्रयत्नही करतो पण एके काळी अति जिवलग असलेला मित्र नंतर कथानायकासाठी एकदा भेटण्याच्या पात्रतेचाही राहत नाही. असा होतं नाही का बऱ्याच वेळेला - आयुष्यातला एक काळ एखादी व्यक्ती आपल्याला खूप प्रिय असते, आपण खूप आदर करतो, विश्वास करतो किंवा प्रेम करतो त्या व्यक्तीवर पण जसा काळ जातो तस तसं त्या व्यक्तीची आपल्याला सगळीच रूपं दिसतात आणि आपल्याला ती व्यक्ती नकोशी होते.
किंवा ज्या व्यक्तीला आपण सर्वस्व मानलं किंवा ज्या व्यक्तीवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवला किंवा जी व्यक्ती आपल्याला खूप खूप आवडते आणि नंतर जेव्हा हे कळतं कि त्या व्यक्ती साठी आपण मात्र तितकेसे महत्वाचे नाही तेव्हा मात्र आपण त्या व्यक्ती पासून आपसूकच खूप लांब निघून जातो... मनाने तर नक्कीच.
कथानायकाच्या धाकट्या बहिणीच्या मृत्यूची गोष्ट हि तशीच - मनाला दुखवून जाणारी, एकही नातेवाईक मेलेला नाही अशी व्यक्ती नाहीच पण मृत्यू समजलाय अशी एकही व्यक्ती मिळणार नाही, गूढ मृत्यू आणि त्याचं चिरंतन अस्तित्व - चिंतन करण्याचाच हा विषय. लेखकाचं गाव असो, परिवार असो, मित्र असो कि शिक्षक आणि समाजजीवन सगळंच कालानुरूप आज बदलेल आहे पन मूळ प्रश्न आणि मानवी स्वभाव आहे तसाच आहे.
कोसला हा एक अनुभव आहे आणि वाचनप्रिय वाचकांनी त्याचा लाभ घ्यायलाच हवा. तुम्ही वाचलीये का कोसला? कशी वाटली हि कादंबरी तुम्हाला?